भांडणात मध्यस्थी करणार्‍याला केली मारहाण

भांडणात मध्यस्थी करणार्‍याला केली मारहाण

मार्केटयार्डात घडली घटना

marathinews24.com

पुणे – भांडणात मध्यस्थी करणार्‍या तरूणाच्या डोक्यात बांबू मारून त्याला गंभीररित्या जखमी केल्याची घटना २ मार्चला सकाळी अकराच्या सुमारास मार्केटयार्डात घडली आहे. याप्रकरणी नागेश गजानन मुंडकर वय २१ रा. फळमार्केट, मार्केटयार्ड याला अटक करण्यात आली आहे. २५ वर्षीय तरूणाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

लोहगावात टोळक्याची दोघांना बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आणि आरोपी नागेश मुंडकर यांच्यात २ मार्चला वाद सुरू होता. त्यावेळी तक्रारदाराच्या भावाने आरोपीला भावासोबत वाद करू नकोस, असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने तक्रारदाराच्या भावाच्या डोक्यात बांबूने मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×