लोहगावात टोळक्याची दोघांना बेदम मारहाण

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना ३ मार्चला रात्री साडेदहाच्या सुमारास लोहगावमधील सौरभ दुध डेअरीजवळ घडली आहे. याप्रकरणी ३१ वर्षीय तरूणाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितांच्या आत्महत्येप्रकरणी कठोर कारवाई करा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लोहगावमध्ये राहायला असून, ३ मार्चला रात्री साडेदहाच्या सुमारास ते मित्रासह सौरभ दुधडेअरीजवळ थांबले होते. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनामध्ये धरून घटनास्थळी आलेल्या चौघांनी तक्रारदारासह त्यांच्या मित्राला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने तक्रारदाराला लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×