Breking News
उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडापुण्यात रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरूणाला बेदम मारहाणमेंहदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला लुटलेकाय सांगता…बंगल्यात केली गांजाची लागवड‘भारताची भीमज्योत’ बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारीवृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम, प्रसारासाठी विशेष उपक्रम

डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण

marathinews24.com

पुणे – बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरणात रक्तनमुना फेरफार केल्यामुळे अटकेत असलेल्या डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ससून रुग्णालयाचे माजी फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे याला जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात – सविस्तर बातमी 

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ च्या पहाटे अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवून तरूण- तरुणीला धडक दिली.. अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्‍याचा आरोप झाला. घटनेनंतर अल्‍पवयीन मुलाला निबंध लिहण्याची व वाहतुक नियमन करण्याची दिलेली शिक्षा देशभर चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर तपास अधिक खोलवर गेला असता रक्तनमुने बदलल्याचा गंभीर आरोप पुढे आला. अल्पवयीन चालकाच्या रक्तातील मद्याचे पुरावे लपवण्यासाठी संगनमत केल्याचा दावा पोलिसांनी केला. याच प्रकरणात ससून रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नावे समोर आली.

डॉ. अजय तावरे याचा देखील सहभाग पोलिस तपासात समोर आले. जुलै २०२४ मध्ये पुणे पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी कथितपणे रचलेल्या कटाची माहिती देण्यात आली. मध्यस्थांमार्फत डॉक्टरांशी संपर्क साधून रक्तनमुने बदलण्यात आल्याचा आरोप तपासात नमूद केला. डॉ. अजय तावरे याच्यावरही या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला. तपास यंत्रणेनुसार, तो संबंधित दिवशी रजेवर असला तरी संगनमतात त्यांची भूमिका असल्याचे म्हटले गेले. त्याला मे २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती आणि ते तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत होता.

समानता तत्‍वावर जामीन (पॅरीटी)

डॉ. तावरे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये फेटाळला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या वतीने मांडण्यात आले की, या प्रकरणातील इतर काही सहआरोपींना आधीच जामीन मंजूर झाला आहे आणि ते जवळपास एकवीस महिने तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंची बाजू ऐकून ‘समता तत्त्वा’चा आधार घेत त्यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला.

डॉ. तावरेला जामीन देताना घातलेल्‍या अटी

डॉ. तावरे याने खटल्यात पूर्ण सहकार्य करावे, साक्षीदारांशी कोणताही संपर्क साधू नये आणि जामिनाच्या अटींचा गैरवापर करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होईल, असेही आदेशात नमूद आहे.

जामीन मिळालेले आरोपी

डॉ. अजय तावरे, अमर गायकवाड (मध्यस्थ), आशपाक मकानदार (मध्यस्थ), मागील सीटवर बसलेला अल्‍पवयीन, आशिष मित्तल, शिवानी अग्रवाल, अल्‍पवयीन चालक

अद्याप कारागृहात असलेले आरोपी

विशाल अग्रवाल (बिल्‍डर), ससून रूग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर, ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे कारागृहात आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×