Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

वाहतूक पोलिसांच्या चलनामुळे मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद

वाहतूक पोलिसांच्या चलनामुळे मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद

८ मोबाईल जप्त, दुचाकी जप्त

marathinews24.com

पुणे – स्मार्ट पोलीस अन् चोरट्यांची जेरबंदी असा काहीसा प्रकार समोर आला आहे. मुंबईतून दुचाकी चोरी केल्यानंतर पुण्यात मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या चलन कारवाईद्वारे या टोळीचा पर्दाफाश केला. टोळीकडून ८ मोबाईल जप्त केला असून, दुचाकीही पकडली आहे.अर्जुन कमलेश सरोज (वय १८, रा. आंबेगाव पठार) इमरान शफीक शेख (वय १८, रा. नवी मुंबई) रवीकुमार राजेंद्रकुमार (वय २१) प्रदिप कुमार महेंद्रकुमार (वय २१, रा. सर्व मूळ. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या टोळीचे नाव आहे.

पुण्यात तरुणावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, पिस्तूलही जप्त – सविस्तर बातमी 

शहरात चैन स्नॅचिंग तसेच मोबाईल चोरणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकट्या महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याची मोबाईल स्नॅचिंग हिसकावणाऱ्या टोळ्याही कार्यरत झाल्या आहेत. सातत्याने या घटना घडत आहेत. पर्वती भागात मोबाईल हिसकावल्याची घटना घडल्यानंतर पोलिस तपास सुरू केला होता. तेव्हा कर्मचारी प्रकाश मरगजे यांना आरोपींच्या दुचाकीची माहिती मिळाली. दुचाकीची माहिती काढली असती ती मुंबईतून चोरल्याची समजली. दुचाकीची माहिती काढली. संबंधित दुचाकी मालकाशी संपर्क साधला. तेव्हा त्याने दुचाकी चोरी झाल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला.

दुसरीकडे वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंड टाकला जात आहे. याचाच फायदा घेत वाहतूक नियमांचे दंड संबंधित दुचाकीवर टाकले जात होते. त्याची माहिती मालकाच्या मोबाईलवर जात होती. त्या माहितीचा आधार घेऊन पर्वती पोलिसांनी या टोळीचा ठिकाणा शोधला. तसेच, त्यांचा पाठलाग करून चौघांच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी शहरातील विविध भागातून मोबाईल चोरल्याचे समोर आले. त्यांच्याकडून ८ मोबाईल व दुचाकी जप्त केली आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हे चोरटे पोलिसांच्या हाती लागल्याचेही स्पष्ट झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×