चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पादचारी महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसबा पेठेत फ्लॅट फोडला; ६ लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय तक्रारदार महिला ६ मार्च रोजी हडपसर भागात खरेदीसाठी आल्या हाेत्या. त्या सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी फाटा परिसरात राहायला आहेत. खरेदी करुन रात्री आठच्या सुमारास त्या हडपसरमधील रवीदर्शन परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. दुचाकीवरुन चोरटे भरधाव पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.






















