Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

मोक्का कारवाईनंतर फरार झालेले दोघे अटकेत

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) फरार झाालेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ओैंध आणि आकुर्डी परिसरात ही कारवाई करण्यात आली. संतोष सुरेश भालेराव (वय २१, रा. पाषाण), आकाश ऊर्फ अक्की संतोष देवकर (वय २०, रा. मोशी, पिंपरी चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या फरार आरोपींची नावे आहेत.

लघुशंका करताना हटकल्‍याने खुनाचा प्रयत्‍न – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी भालेराव हा आकुर्डीतील खंडोबाचा माळ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मकोका कारवाईनंतर फरार झालेला आरोपी देवकर हा ओैंधमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. आरोपी भालेराव आणि देवकर यांच्याविरुद्ध खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस कर्मचारी प्रवीण राजपूत, अजय गायकवाड, प्रवीण भालचिम, सुभाष आव्हाड, विठ्ठल आव्हाळ, विशाल इथापे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×