तब्बल २६७ बोगस कामगार दाखवून कंपनीला १ कोटींचा गंडा

मध्य प्रदेशमधील कंपनीच्या पुणे कार्यालयातील प्रकार

marathinews24.com

पुणे – मध्य प्रदेशातील खाणीमध्ये काम करणार्‍या कामगारांच्या वेतन पत्रकात जानेवारी २०२६ मध्ये २६७ बोगस कामगार दाखवून कंपनीच्या खात्यातून १ कोटी रुपये काढून मनुष्यबळ व्यवस्थापकाने सी एल एफ प्रोजेक्ट कंपनीला गंडा घातला आहे. यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्याची चैन हिसकावणारा अटकेत – सविस्तर बातमी

सुनिल आनंदराव यादव (वय ६१, रा. स्कायवन, मॉडेल कॉलनी) यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी शैलेंद्रसिंग राठोड (रा. चतु:श्रृंगी मंदिराजवळ, मुळ रा. छावणी शिकार, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीमधील कंपनीच्या कार्यालयात १० फेब्रुवारी २०२६ ला घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनीतील सी एल एफ प्रोजेक्ट कंपनीच्या मध्यप्रदेशात खाणी आहे. खाणीतून खनीज बाहेर काढण्यापूर्वी त्यावरील माती काढण्याचे काम करावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार लावले जातात. राठोड हा कंपनीत मानव संसाधन व्यवस्थापक म्हणून काम करतो. या कामगारांचे पगार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. राठोडने जानेवारी २०२६ मध्ये कंपनीच्या वेतन पत्रकात ९०० कामगारांच्या खात्यावर त्यांचे वेतन पाठविले. याबाबत कंपनीने अंतर्गत परिक्षण केल्यावर ९०० कामगारांपैकी २६७ कामगार हे वेतन पत्रकाच्या बाहेरील असून ते कंपनीचे कामगार नसल्याचे निदर्शनास आले. कंपनीच्या खात्यातून सुमारे १ कोटी २ लाख रुपये नव्या समाविष्ठ करण्यात आलेल्या बनावट २६७ लोकांच्या खात्यावर पाठवून सी एल एफ प्रोजेक्ट कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×