Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये ५७५ दाखल्याचे वितरण

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये ५७५ दाखल्याचे वितरण

वैभव नावडकर यांची माहिती

marathinews24.com

बारामती – महसूल विभागाच्यावतीने काटेवाडी येथे शनिवारी (७ मार्च) आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये नागरिकांना २६७ संगणकीकृत सातबारा २६७, ८-अ उतारा २५१, विविध विभागाकडील दाखले २३७ असे एकूण ५७५ दाखले वितरित करण्यात आले आहे, कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणांवर सुनावणी – सविस्तर बातमी 

यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे, निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे, महसूल नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संजय धोंगडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी तितिक्षा बारापत्रे, काटेवाडीच्या सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे, मंडळ अधिकारी राजेंद्र गिरमे, काटेवाडी मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, आधार कार्ड केंद्रचालक, सीएससी, महा-ईसेवा केंद्रचालक, गॅस पुरवठादार आदी उपस्थित होते.

नावडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये नागरिकांना भेडवासणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यात येईल, येत्या १४ मार्च रोजी शिर्सुफळ येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन नावडकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजनाबाबत माहिती देतांना रावडे म्हणाले, महसूल विभागातील प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ अभिलेख दुरुस्ती, अकृषक तरतुदी सुधारणा, कमी जास्त पत्रके तयार करणे, पाणंद रस्ते, ई-मोजणी अर्ज, जिवंत ७/१२ टप्पा २ अंतर्गतच्या नोंदीबाबत मार्गदर्शन केले. विविध विभागाच्या योजना व सेवांविषयी मार्गदर्शन केले.

शिबीरात निकाली फेरफार ४३ करण्यासोबतच ७/१२ मधील दुरुस्तीसंदर्भात ५७ अर्ज प्राप्त झाले, एक खिडकी योजनेअंतर्गत ४१ अर्ज निकाली तसेच अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर २ प्रकरणे अद्यावत करण्यात आले. महसूल, भूमी अभिलेख, पुरवठा, ग्रामविकास, आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी विभाग, टपाल कार्यालय आदी विभागांच्या सेवांच्या लाभ देण्यात आला. नावडकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध विभागामार्फत देण्यात आलेल्या लाभाचे वाटप करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×