एसपींनी आखले नियोजन
marathinews24.com
बीड – बीड पोलीस दलातल्या रिक्त १७४ जागांसाठी सुमारे ८ हजार १३४ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यानुसार पहिल्या टप्प्यात या भरतीसाठी शारिरीक परीक्षा घेण्यात आली आहे. तर आता या भरतीच्या लेखी परीक्षेसाठी १हजार ९०१ उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या या उमेदवारांची येत्या रविवारी लेखी परिक्षा आदित्य कॉलेजमध्ये होणार आहे. याअनुषंगानेच पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तगडे नियोजन केले आहे.
डबल डेकर फ्लाय ओव्हरची तपासणी सात दिवसांत – सविस्तर बातमी
बीडसह काही जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. बीड पोलिस दलात १७४ जागांसाठी तब्बल ८ हजार १३४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शारिरीक चाचणी घेण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याही परिक्षेचे नियोजन केले होते. त्यामुळेच ही परिक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडली आहे.आता या भरतीमधील लेखी परिक्षेसाठी १हजार ९०१ उमेदवार पात्र ठरले आहेत.
पात्र ठरलेल्या १०० गुणांची होणार परीक्षा
पोलिस भरतीसाठी १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ९० मिनीटांचा वेळ असणार असून सकाळच्या सत्रात ही परिक्षा पार पडणार आहे.उमेदवारांची ही परिक्षा येत्या रविवारी शहरातील आदित्य कॉलेजमध्ये पार पडणार आहे.
सेंटरला भेट देवून अपर पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी
लेखी परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे होणार आहे. त्याअनुषंगानेच काल आदित्य कॉलेजला भेट देवून अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी पाहणी केली आहे. यावेळी डीएसबीचे पोलिस निरीक्षक श्री. कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्याअनुषंगानेच पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तगडे नियोजन केले आहे.























