अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात
marathinews24.com
पुणे – शहरातील लष्कर भागातील भोपळे चौकात असलेल्या इमारतीत आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. भोपळे चौकात असलेल्या एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर कपड्यांचा, तसेच गृहोपयोगी साहित्याचा साठा होता. मंगळवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कपड्याच्या साठाला आग लागली होती.
अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांना २२ महिन्यानंतर जामीन – सविस्तर बातमी
मोठ्या प्रमाणावर धूर आल्याने परिसरात घबराट उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच पुणे महापालिका आणि पुणे कटक मंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी चार बंब दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन दहा ते पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली. आगीत कपड्याचा साठा जळाला. सुदैवाने या घटनेत काेणी जखमी झाले नाही, आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
ओैंधमध्ये सदनिकेत आग
ओैंध परिसरात सोसायटीत असलेल्या सदनिकेत आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. ओैंध परिसरात निर्मल को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे. या सोसायटीतील एका सदनिकेत काही विद्यार्थी (पीजी) राहत होते. बंद सदनिकेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.























