Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांना २२ महिन्यानंतर जामीन

अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांना २२ महिन्यानंतर जामीन

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण

marathinews24.com

पुणे – पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. गेल्या २२ महिन्यांपासून अगरवाल हे कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला असून, ट्रायल कोर्टाने लादलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहूनच हा जामीन मंजूर करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशात नमूद केले आहे.

पुण्यात सोन्याच्या बिस्किटांच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी 

पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये १९ मे २०२४ रोजी अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील तरूण तरूणीचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी कार चालवणार्‍या अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विशाल अगरवाल यांच्यासह १० जणांना अटक केले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. अगरवाल २२ महिन्यांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फाटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अगरवाल यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अटी-शर्तीवर त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यांनी खटल्याच्या तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांशी संपर्क साधू नये, तसेच जामीनाच्या अटींचा गैरवापर करू नये, संबंधित अटींचे उल्लंघन झालाल्यास जामीन रद्द होईल, अशा अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी आत्तापर्यंत आठ जणांना जामीन मिळाला असून अद्याप दोघे जण कोठडीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×