Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात सोन्याच्या बिस्किटांच्या आमिषाने फसवणूक

पुण्यात सोन्याच्या बिस्किटांच्या आमिषाने फसवणूक

रेकॉर्डवरील आरोपी अटकेत

marathinews24.com

पुणे – बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव (वय ५२, रा. जळकोट, जि. लातूर) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १२ लाख ७५ हजारांचा ऐवज, दोन बनावट सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातूची बिस्किटे, बॅनेटेक्सची चेन जप्त करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीला आत्महत्येतस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीला सहा महिन्याचा कारावास – सविस्तर बातमी 

फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले हे हडपसर परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपीची माहिती मिळाली. तो साधना विद्यालयाकडे जाणाऱ्या कॅनल रोड परिसरात चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीने फरासखाना ठाण्याच्या हद्दीत २४ जुलै २०२५ रोजी प्रेमळ विठ्ठल मंदिराजवळ जेष्ठ महिलेला जेवण वाटपाच्या ठिकाणी गर्दी असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पिशवी घेऊन पळ काढल्याची कबुली दिली. तसेच त्याने साथीदारासह कराड (जि. सातारा) येथेही अशाच प्रकारे वृद्ध महिलेची फसवणूक करून मंगळसूत्र लांबविल्याचे उघड झाले. यासंदर्भात कराड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.आरोपीवर अपहरण, अट्रॉसिटी फसवणुकीसारखे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, एसीपी राजेंद्र मुळीक, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात, आझाद पाटील यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×