Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चेष्टा मस्करीतून वास्तूविशारद तरुणाचा भोसकून खून

लष्कर भागातील घटना; तिघे अटकेत

marathinews24.com

पुणे – चेष्टा मस्करीतून वास्तूविशारद तरुणावर चाकूने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना लष्कर भागातील मोदीखाना परिसरात घडली. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी तिघांना अटक केली. फैसल फारुख खान (वय ३०, रा. कौसरबाग, कोंढवा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अली अब्बास अश्रफअली सय्यद (वय २५, रा. चुडामण तालीम,भवानी पेठ), सोहेल युसुफ तांबोळी (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर), अश्रफअली गफार सय्यद (वय ५५, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुगुन्हा दाखल केला आहे.

पिस्‍तुलातून गोळी झाडून तरूणाची आत्‍महत्‍या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल खान हा वास्तूविशारद होता. तो एका खासगी कार्यालयात कामाला होता. मंगळवारी रात्री तो लष्कर भागातील न्यू मोदीखाना परिसरात मित्रांबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन निघाले होते. फैसलने चेष्टेत एकाला हाक मारली. त्यानंतर दुचाकीवरील आरोपी सय्यद, तांबोळी, सय्यद तेथे आले. आरोपींनी मोबाइलवरुन संपर्क साधून साथीदारांना बोलावून घेतले. चेष्टेत हाक का मारली? अशी विचारणा केली. आरोपींनी फैसलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेतील फैसलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×