Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पिस्‍तुलातून गोळी झाडून तरूणाची आत्‍महत्‍या

पिस्‍तुलातून गोळी झाडून तरूणाची आत्‍महत्‍या

पुण्यातील नांदेडसिटी आसावरी इमारतीतील घटना

marathinews24.com

पुणे – मामाकडे राहत असलेल्‍या २१ वषीय तरूणाने स्वतःच्‍या डोक्‍यात गोळी झाडून घेत आत्‍महत्‍या केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार नांदेडसिटी येथील असावरी इमारतीतील एका सदनिकेत घडला. पार्थ बापु गोरे ( वय २१ रा. असावरी इमारत, नांदेडसिटी, पुणे) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश कसबे यांनी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात रूममेटच्या जाचाला कंटाळून तरूणीची आत्महत्या – सविस्तर बातमी 

नांदेड पोलिसांना दि. १० मार्चला एकाने इमारतीतील सदनिका क्रमांक १२०६ येथे पिस्‍तुलातून गोळी झाडून आत्‍महत्‍या केल्‍याचे समजले. तात्‍काळ पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. यावेळी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले. त्याने कानाच्‍या मागे गोळी झाडून घेतल्‍याचे दिसून आले. त्‍याला लागलीच रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याने डॉक्‍टरांनी घोषीत केले. त्‍याच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याचा मृतदेह त्‍याच्‍या बहीणीकडे सुपुर्त केला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.

पार्थ गोरे हा आपल्‍या मामाकडे नांदेडसिटी येथे राहत होता. तो कोणता कामधंदा करत नव्हता. मात्र त्‍याने अचानक आत्‍महत्‍या का केली याचे कारण समजु शकले नाही. पोलिस त्‍याचा तपास करत आहे. त्‍याने ज्‍या पिस्‍तुलातून आत्महत्‍या केली. ते पिस्‍तुल बेकायदेशिर असल्‍याचे निष्पन्न झाले आहे. त्‍याला हे पिस्‍तुल कोणी दिले याचाही तपास सुरू आहे. पुढील तपास नांदेडसिटी पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×