Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात रूममेटच्या जाचाला कंटाळून तरूणीची आत्महत्या

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

तिघींविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रूममेटच्या जाचाला कंटाळून १९ वर्षीय मुलीने पंख्याला गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ९ मार्चला सकाळी साडेसातच्या सुमारास चंदननगरमधील विठ्ठलनगरातील अरिहंत कॉम्प्लेक्स महावीर सोसायटीत घडली. याप्रकरणी तरूणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या तिघांविरूद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोने कमी किंमतीत देण्याची बतावणी, ५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पायल किशोर राजगुरू (वय १९, रा. कासार अंबोली मुळशी ) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी सबुरी संतोष काळे (वय २५) शिवानी शाम आजबले (वय २६ )आणि दीपाली (पुर्ण नाव नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनगरमधील विठ्ठलनगरात अरिहंत कॉम्प्लेक्स महावीर सोसायटी असून, त्याठिकाणी पायल राजगुरू हिच्यासह चौघीजणी राहत आहेत. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाल्यानंतर तिघींनी पायलला मानसिक त्रास दिला. तिची बदनामी करण्याची धमकी देउन आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. सततच्या जाचाला कंटाळून पायलने ९ मार्चला सकाळच्या सुमारास खोलीतील पंख्याला दोरीच्या मदतीने गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दशरथ तलेदवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×