काळेपडळ पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – हॉटेल व्यवसायिकासह इतर व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या कुख्यात गुंड रिजवान उर्फ टिपू सतार पठाण याच्यासह ७ जणांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मुख्य आरोपी रिजवान उर्फ टिपू सतार पठाण (वय ३४, रा प्लाझा मंजिल, फ्लॅट नं. ९०, सय्यदनगर, हडपसर, पुणे) याने इतर साथीदारांसह हॉटेल व्यावसायिकाला सय्यदनगरातील ऑफिसमध्ये बोलावून खंडणी मागितली होती.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या बतावणीने गंडा – सविस्तर बातमी
भागीदारीतील मटन दुकानातून मटन खरेदी करण्यास सांगून, हॉटेल सुरू ठेवायचे असल्यास दरमहा पाच हजाराच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी टोळी तयार करून वारंवार गुन्हे केल्याचे समोर आले. दरम्यान, या गुन्ह्यातील फरार आरोपी फैजान उर्फ पच्चीस समशान उर्फ कादर शेख (वय २१, रा. गली नं. १९, सय्यदनगर, मोहम्मदवाडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर मोक्का कारवाई केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, एपीआय अमित शेटे, राजेंद्र वाघमारे, प्रशांत काळे यांनी कारवाई केली.






















