शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

जास्त परताव्याचे आमिष पडले २० लाखांना

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची दहा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५१ वर्षीय महिला विधी महाविद्यालय रस्त्यावर राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजराात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या खात्यात महिलेने नऊ लाख ९१ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यनंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×