Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वाहतूक नियमभंगाची एपीके फाईल पाठवून पावणेतीन लाखाांची फसवणूक

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाहतूक नियमभंगाची एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी एकाची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘म्हाडा’त सदनिकेत मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टिळक रस्त्यावर राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर वाहतूक नियमभंगाची एपीके फाईल पाठविली होती. चोरट्यांनी पाठविलेली एपीके फाईल उघडताच तक्रारदाराचा मोबाइल क्रमांक सायबर चोरट्यांनी हॅक करुन बँक खात्यातून पावणेतीन लाख रुपयांची रोकड लांबविली. खात्यातून पैसे काढून ते दुसऱ्या खात्यात हस्तांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×