कोयत्याने वार करुन तरुणाचा खून

पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरार

तीन संशयित ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात तरुणावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घटना घडली. प्राथमिक तपासात तरुणाचा वैमनस्यातून खून करण्यात आल्याची माहिती मिळाली असून, पसार झालेल्या तीन संशयितांना रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशीरा सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनी हल्‍ल्‍यात कोयता अडकला डोक्‍यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणचा आठवडाभरापूर्वी काही जणांशी वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तो सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरातून दुचाकीवरुन निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्याला अडवले. त्याच्यावर कोयत्याने भर रस्त्यात वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. तरुणावर भररस्त्यात कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सनसिटी परिसरात घबराट उडाली. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशीरा खून प्रकरणात तिघांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×