खुनी हल्‍ल्‍यात कोयता अडकला डोक्‍यात

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

डोक्‍यात रूतलेला कोयता घेऊन रूग्णालयात दाखल

marathinews24.com

पुणे – शिवीगाळ केल्याच्या वादातून टोळक्याने रस्‍त्‍यात भरदिवसा दोघांवर कोयत्‍याने हल्‍ला केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. आश्चर्याची बाब म्‍हणजे तरूणाच्‍या डोक्‍यात कोयता अडकल्‍याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धेश बबनराव भोसले (वय २२, सध्या रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. अंबड, जि.जालना), नागेश सुनील जगताप अशी जखमी झालेल्यांची नाव आहेत. सिद्धेशने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुख्यात गुंड सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश आणि त्याचा मित्र नागेश हे गुरुवारी (१२ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास वाघोलीतील रायसोनी महाविद्यालय परिसरात एका चहा टपरीवर थांबले होते. त्यावेळी टोळके तेथे आले. शिवीगाळ का केली, असा जाब विचारुन आरोपींनी सिद्धेश आणि त्याचा मित्र नागेश यांच्यावर धारदार कोयत्‍याने वार केले. दोघांपैकी एकाच्‍या डोक्‍यात आरोपींनी ज्‍या कोयत्‍याने हल्‍ला केला. तो कोयताच डोक्‍यात अडकला. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. त्‍याला त्‍याच्‍या मित्राने डोक्‍यात कोयता अडकलेल्‍या अवस्‍थेत दुचाकीवर बसवून उपचारासाठी रूग्णालयात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार करून तरुणाचा जीव वाचवला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×