Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

Maharashtra Kesari 2026 : पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली

Maharashtra Kesari 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

marathinews24.com

पुणे Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून कुस्ती रसिकांची मने जिंकली आहेत, असे गौरवोद्गार काढत या स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा थरार अनुभवायला मिळाला. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर यांनी दमदार खेळ करत मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली. अंतिम सामन्यातील हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांची झुंज ही खऱ्या अर्थाने कुस्ती परंपरेची मान उंचावणारी ठरली. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, परंपरेचा ठेवा असलेला रांगडा क्रीडाप्रकार आहे, कुस्तीच्या माध्यमातूनच पै. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. ही परंपरा पुढे नेण्याचे काम आजचे तरुण पैलवान करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.

वाघोली येथे पार पडलेल्या Maharashtra Kesari 2026 च्या स्पर्धेत अनेक रोमांचक आणि चुरशीचे सामने रंगले. भव्य आणि उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धेला विशेष उठाव प्राप्त झाला. या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×