Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी व सांस्कृतिक संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्यावतीने विमाननगर येथील सिम्बॉयसिस ऑडिटोरियममध्ये ‘मोगरा फुलला’विशेष सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ताल–सुरांच्या मिलाफाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सांगता – सविस्तर बातमी 

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेविका ऐश्वर्या पठारे, ज्येष्ठ नागरिक दिलीप पवार आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण दादा पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने अधीक्षक जानवी जानकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

या सोहळ्यात गणेश शिंदे यांनी ‘मोगरा फुलला’ हे सादरीकरण सादर केले. अभ्यासपूर्ण निवेदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिमय झाले होते. संत साहित्यावर आधारित या कार्यक्रमाने उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णाई उळेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी जानवी जानकर यांनी सर्वांचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×