Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

कोरेगाव पार्कमध्ये डाॅक्टरांचा हलगर्जीपणा उघड

कोरेगाव पार्कमध्ये डाॅक्टरांचा हलगर्जीपणा उघड

रूग्ण मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोरेगाव पार्क भागातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दोन डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची ससून रूग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने चौकशी केल होती. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुण्यात बोअरवेलमुळे मेट्रो मार्गेकेवर पाणी गळती – सविस्तर बातमी 

डाॅ. नीलेश कोद्रे, तसेच आणखी एका डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उर्मिला प्रवीण म्हस्के (वय ३०, रा. संत गाडगेमहाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण म्हस्के यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ऑगस्ट २०२४ मध्ये कोरेगाव पार्क भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० ऑगस्ट रोजी म्हस्के यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी उर्मिला म्हस्के यांनी फिर्यादीत केला होता.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने रुग्ण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीत डाॅक्टर दोषी आढळल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक जितेद्र खैरनार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×