Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

दोन तरुण अटकेत

marathinews24.com

पुणे – शहरातील चंदननगर परिसरात अल्पवयीन युवतींना धमकावून त्यांच्या बलात्कार करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या. या प्रकरणात पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन युवतीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी बालाजी गुरुनाथ स्वामी (वय २७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे.

कोरेगाव पार्कमध्ये डाॅक्टरांचा हलगर्जीपणा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती अल्पवयीन असल्याची माहिती स्वामीला होती. त्याने मुलीला जाळ्यात ओढले. युवतीवर त्याने वेळोवेळी बलात्कार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवतीच्या आईने त्याला जाब विचारला. तेव्हा आरोपी स्वामी पीडित युवतीच्या घरात शिरला. त्याने तिची आई आणि वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

आणखी एक घटना चंदननगर भागात घडली आहे. अल्पवयीन युवतीवर बलात्कार करुन तिची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ऋतिक रावसाहेब लोणके (वय २७, रा. सोमनाथननगर, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन युवतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवतीला लोणके याने विवाहाचे आमिष दाखविले. विवाहाच्या आमिषाने त्याने तिच्यावर बलात्कार केला. ही बाब युवतीच्या मावशीला समजली. मावशीने लोणके याला जाब विचारला. तेव्हा मला तिच्याबरोबर बोलू दिले नाही, तर समाज माध्यमात युवतीची छायाचित्रे प्रसारित करेल, अशी धमकी दिली. लोणके याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यनंतर त्याला अटक करण्यात आली. चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दाेन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनयमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली आणि हडपसर पोलीस ठाण्याात दोन अल्पवयीन युवतींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी अल्पवयीन मुलींना पळवून नेल्या प्रकरणी वाघोली आणि हडपसर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखळ करण्यात आले आहेत. शहरात अल्पवयीन मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांना पळवून देण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण, तसेच बलात्कार प्रकरणातील तक्रारी प्राधान्याने नोंंदवून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×