Pune ACB trap : पुण्यात लाच घेताना वनक्षेत्र ‘सर्व्हेअर’ला पकडले

Pune ACB trap

सेनापती बापट रस्त्यावर कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune ACB trap : जमिनीच्या सात बारा उताऱ्यावरील वनक्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी तब्बल ४ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वन विभागातील मोजणी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)पकडले. सेनापती बापट रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
उदयसिंग भीमराव कुंभार (वय ४६, सध्या रा. कात्रज, मूळ रा. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या वनविभागातील मोजणी कर्मचाऱ्योच नाव आहे. याप्रकरणी कुंभार यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता – सविस्तर बातमी 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जमीन खरेदी विक्री व्यवसाय करतात. वडगाव मावळ तालुक्यातील चिखलसेगाव, आपटी, कुणेनामा या गावात तक्रारदाराने जमीन खरेदी केली आहे. काही जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर खासगी वनाचे शेरे लागले होते. हे शेरे काढून टाकण्यासाठी त्यांनी महसूल विभागाकडून आदेश मिळवून त्याबाबतच्या नोेंदी वन विभागाच्या कागदपत्रांवर घेण्यासाठी अर्ज दिला होता. याबाबतची प्रत मिळविण्यासाठी त्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील उपवनसंरक्षक कार्यालयात अर्ज केला होता. अर्जाच्या चौकशीसाठी ते वनविभागाच्या कार्यालयात गेले. हे काम वनक्षेत्र मोजणी कर्मचारी उदयसिंग कुंभार यांच्याकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली. कुंभार यांनी ११ आदेशांपैकी (रिस्टोर्ड ऑर्डर) ७ आदेशांच्या प्रती कार्यालयात आहेत. त्यासाठी ७ लाख रुपयांची लाच कुंभार यांनी तक्रारदाराकडे मागितली.

तक्रारदाराने तडजोडीत चार लाख रुपये देण्याचे मान्य केले. रविवारी सेनापती बापट रस्त्यावर एसबीच्या पथकाने सापळा लावला. तक्रारदाराकडून ४ लाख रुपयांची लाच घेताना कुंभार यांना पकडले. एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश वाळके आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

नारायणगाव येथील इमारतीला अंशत: पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या जुन्नर-आंबेगावमधील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले होते. २७ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी शिंदे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सेनापती बापट रस्त्यावर वनविभागाच्या मोजणी कर्मचाऱ्याला चार लाखांची लाच घेताना पकडण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×