पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात

सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरातील कारवाई

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, तसेच एक काडतूस जप्त करण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली.

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी

दांडेकर पूल परिसरात खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी एक अल्पवयीन दांडेकर पूल परिसरात थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल सापडले. अल्पवयीनाने पिस्तूल का बाळगले ?, तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता का ?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, अमोल राऊत, आझाद पाटील, शेखर खराडे, चेतन आपटे, किरण पड्याळ यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×