Breking News
‘भारताची भीमज्योत’ बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारीवृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम, प्रसारासाठी विशेष उपक्रमलोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा ‘… तर आपल्या पक्षाचा विस्तार वेगाने करणे हेच उद्दिष्ट’नवीन सोलर धोरण राज्यातील उद्योगांना मारकडेक्कन परिसरात टोळक्याची एकाला बेदम मारहाण, दातही पाडलेपुण्यात तरुणाचा खून करून पसार आरोपी सहा वर्षानंतर अटकेतशिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांपर्यंत योजना पोहोचवापुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कोम्बिंग ऑपरेशनअसोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

पर्यावरण संवर्धनादृष्टीने हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर द्यावा-हनुमंत पाटील

पर्यावरण संवर्धनादृष्टीने हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर द्यावा-हनुमंत पाटील

एमआयडीसीच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्ता, घनकचरा व्यवस्थापन, हरित ऊर्जा विषयावर चर्चासत्र संपन्न

marathinews24.com

बारामती – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती कार्यक्षेत्रात असलेल्या कंपन्यानी कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा प्रभावीपणे वापर करावा, उच्च व गुणवत्तापूर्ण उत्पादनासोबतच पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्यादृष्टीने हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत काम करावे, असे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले.

पुण्यात ट्रिपलसीट दुचाकीस्वार रडारवर – सविस्तर बातमी 

एमआयडीसी बारामती कार्यालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कुरकुंभ येथील सिपला कंपनीच्या सभागृह येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, घन कचरा व्यवस्थापन आणि हरित ऊर्जा’ या विषयावर नुकताच आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार,बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी,बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, स्वयमऊर्जाचे राहुल नलवडे, ग्रीनस्पार्क वेंचुर्सचे दर्युस छापखानवाला, प्रोकलिन टेक्नॉलॉजीजचे अलोक गोयल,राजयोग एआय इंडस्ट्रीचे नवनाथ काळे, कार्यकारी अभियंता विजय पेटकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. कंपन्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात हरित प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि ऊर्जा बचती संदर्भातील उपक्रम राबविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी सूचना केल्या. या सूचना विचारात घेता एमआयडीसीच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×