Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

खराडीत तडीपार गुंडाची दहशत

खराडीत तडीपार गुंडाची दहशत

आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तडीपार गुंड, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने दहशत माजविल्याची घटना खराडी परिसरात घडली. गुंडाने समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित केली. या प्रकरणी खराडी पोलिसांनी तडीपार गुंडासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निखिल मधुकर कांबळे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) याच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; रीलस्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे सराईत असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कांबळे याला परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपार केल्यानंतर कांबळे हा साथीदारांसोबत खराडीतील रक्षकनगर भागात २८ मार्च रोजी सायंकाळी आला.

या भागातील गोल्ड सोसायटीसमोर कांबळे आणि त्याच्याबरोबर असलेले आठ ते दहा साथीदार थांबले होते. आरोपींनी या भागात दहशत माजविली. कांबळेने दहशत माजविण्याची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कांबळेसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल असून, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×