बिबवेवाडीतील स्वीटमार्टमध्ये चोरी, ७० हजारांचा ऐवज चोरीला

बालविवाह प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – स्वीटमार्ट दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ७० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ३० ते ३१ मार्चला बिबवेवाडीतील मयूर स्वीट दुकानात घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली ८५ लाखांना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मार्वेâटयार्डात राहायला असून, बिबवेवाडीतील भारत ज्योती बसस्टॉपजवळ त्यांचे स्वीटमार्ट आहे. ३० ते ३१ मार्चला दुकान बंद असताना त्यांनी ५५ हजारांची रोकड दुकानात ठेवली होती. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. रोकडसह स्वीटमार्टमधील साहित्य असा मिळून ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. दुसर्‍या दिवशी तक्रारदाराला चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×