Breking News
ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमीकेंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटनमराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम लवकरच

निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम लवकरच

पूर्वतयारी बैठकीत प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन

marathinews24.com

पुणे – भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

रिपब्लिकन पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची शनिवारी पुण्यात बैठक – सविस्तर बातमी 

बैठकीस विविध भाजप, एन.सी.पी ( शरद पवार ), एन.पी.पी, आय.एस.एल.ए.एम राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मोजकेच पदाधिकारी उपस्थित राहिले असून बहुतांश प्रतिनिधी अनुपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे एसआयआर प्रक्रियेचे सविस्तर स्पष्टीकरण केले. त्यांनी सांगितले की, विशेष सखोल पुनरीक्षण ही निवडणूक आयोगाची अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया असून यामध्ये मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन केले जाते. अपात्र, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच पात्र नवीन मतदारांची नोंद करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या प्रक्रियेत घरभेटीद्वारे प्रत्यक्ष पडताळणी (डोअर-टू-डोअर व्हेरिफिकेशन) करण्यात येणार आहे. संबंधित कर्मचारी मतदारांच्या घरी जाऊन माहितीची खातरजमा करतील. तसेच नागरिकांना फॉर्म ६ (नवीन नोंदणी), फॉर्म ७ (नाव वगळणे) आणि फॉर्म ८ (दुरुस्ती) यांद्वारे आवश्यक बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, सध्या मतदार यादीत असलेल्या मतदारांनी त्यांच्या नावाची २००२ सालातील मतदार यादीतील नोंद (राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ व भाग क्रमांक) उपलब्ध असल्यास ती माहिती संबंधित बीएलओ (BLO) यांना द्यावी. त्यामुळे बीएलओ त्यांच्या मोबाईल ॲपद्वारे अशा मतदारांचे मॅपिंग सुलभपणे करू शकतील. मतदारांना २००२ मधील माहिती भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच संबंधित भागातील बीएलओ यांची नावे व संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

श्रीमती कळसकर यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना बीएलओ यांची नावे, संपर्क क्रमांक आणि मतदान केंद्रनिहाय माहितीची एक्सेल शीट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाने प्रत्येक मतदान केंद्रासाठी किमान एक बीएलए (BLA) नियुक्त करावा, जेणेकरून अनुपलब्ध मतदारांचा शोध घेण्यासाठी बीएलए, बीएलओ यांना सहकार्य करू शकतील.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, आगामी एसआयआर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनीही आपल्या स्तरावर जनजागृती करून या प्रक्रियेला सक्रिय सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

बैठकीदरम्यान उपस्थितांनी विविध सूचना मांडल्या असून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. आगामी एसआयआर मोहिमेच्या दृष्टीने ही पूर्वतयारी बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×