Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मुसळधार पावसाने फुलविक्रेत्या महिलेच्या अंगावर कोसळले झाड

मुसळधार पावसाने फुलविक्रेत्या महिलेच्या अंगावर कोसळले झाड

सिंहगड रोडवर जेष्ठ महिला ठार

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली होती. तसेच मंदिराशेजारी फुल विक्रीसाठी बसलेल्या एका जेष्ठ महिलेच्या अंगावर मोठे झाड कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रोडवरील नवशा मारूती मंदिराजवळ घडली. टपरीत महिला फुल विक्रीसाठी बसलेली होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी असल्याची बतावणी – सविस्तर बातमी 

रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना गिरी दत्तवाडी येथील गणेश मळा परिसरात राहायला होत्या. त्या फुल विक्रीचा व्यवसाय करत होत्या. गुरूवारी हनुमान जयंती असल्याने त्या सकाळपासूनच सिंहगड रोडवरील नवश्या मारूती मंदिराजवळ फुल विक्री करण्यासाठी बसल्या होत्या. मंदिरा शेजारी त्यांची फुल विक्रीची टपरी आहे. दरम्यान, दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. परिसरात अनेक भागात झाडपडीच्या घटना घडल्या. त्याचवेळी नवश्या मारूती मंदिराजवळ वडाचे भले मोठे झाड महिलेच्या टपरीवर कोसळले. यात महिला अडकली गेली. गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांसह सिंहगड पोलिसांनी धाव घेतली. मात्र घटनेनंतर परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×