Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेटची सोय

उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर

marathinews24.com

पुणे – बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना उमेदवारांविषयी सविस्तर व पारदर्शक माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘ईसीआयनेट’ या एकात्मिक डिजिटल व्यासपीठाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता व दायित्वे, शैक्षणिक पात्रता तसेच अधिकृत सामाजिक माध्यमांवरील खात्यांची माहिती ‘आपला उमेदवार जाणून घ्या’ या घटकाद्वारे पाहता येणार आहे.

ना दहावा, ना तेरावा, तुकाराम मुंढेनी आईच्या अस्थी विसर्जन करुन दिला विज्ञानाचा संदेश – सविस्तर बातमी

मतदारांना ईसीआयनेटमधील “निवडणूक प्रक्रिया” या विभागांतर्गत हा घटक सहज उपलब्ध असून, त्याद्वारे उमेदवारांनी सादर केलेले संपूर्ण प्रतिज्ञापत्र (फॉर्म २६) देखील उतरवता येणार आहे. यामुळे मतदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

ईसीआयनेट हे जगातील सर्वात मोठे निवडणूक सेवा व्यासपीठ असून, भारतातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ४० हून अधिक अँप्स व संकेतस्थळे एकत्रित करून एकसंध डिजिटल अनुभव देण्यात आला आहे. या व्यासपीठाद्वारे मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्जाची स्थिती पाहणे, निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद, ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड, मतदानाचे प्रवाह तसेच तक्रार निवारण यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

ईसीआयनेटवर ‘सी-सिव्हिजल’ या अॅपद्वारे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविता येतात, तर ‘सक्षम’ उपक्रमाद्वारे दिव्यांग मतदारांसाठी सुलभ सेवा पुरविण्यात येत आहेत. या सर्व सुविधा एकाच सुरक्षित व्यासपीठावर उपलब्ध असल्याने मतदारांना तत्काळ माहिती व तक्रार निवारणाची प्रभावी सोय मिळत आहे. बारामती पोटनिवडणुकीत पारदर्शक, सुजाण आणि सक्रिय मतदानासाठी मतदारांनी ईसीआयनेटचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×