Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य; रिक्षाचालक अटकेत

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

आरोपीविरुद्ध २४ तासात आरोपपत्र

marathinews24.com

पुणे – शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी २४ तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. युुनूस गफार खान (वय ५५, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, खान याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वारगेट परिसरात खुनाचा प्रयत्न, वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी पीडीत ११ वर्षीय शाळकरी मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्या वेळी रिक्षाचालक खान याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खान पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. खान याला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.

गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करुन आवश्यक ते पुरावे संकलित करुन त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासात आरोपपत्र दाखल केले. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, निलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद साने, दत्तात्रय खेडेकर, कानेकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×