Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

उत्तर प्रदेशातील व्यावसायिकाचे अपहरण

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

५० लाखांची खंडणी मागणारे अटकेत

marathinews24.com

पुणे – खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करुन उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आले. याप्रकरणी खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रुपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद), प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत व्यावसायिकाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात मतिमंद महिलेवर बलात्कार – सविस्तर बातमी

तक्रारदार ४० वर्षीय व्यावसायिक मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूरचा रहिवासी आहे. सध्या ते गहुंजे भागात राहायला आहेत. आरोपी झुरुंगे, वाळुंज, सहाणे, गावडे, राऊत यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. खडी क्रशर व्यवसायासाठी जागा दाखवितो, असे सांगून आरोपींनी त्यांना मंगळवारी (१४ एप्रिल) खराडी आयटी पार्क परिसरात बोलावले. तेथील एका उपाहार गृहाजवळ ते दुपारी बाराच्या सुमारास थांबले होते. आरोपींनी त्यांना जागा दाखविण्याचा बहाणा केला. आरोपींनी त्यांना मोटारीतून एके ठिकाणी नेले. त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास खराडी परिसरात सोडून आरोपी पसार झाले. घाबरलेल्या व्यवासायिकाने घटनेची माहिती पोलिसांना दिली.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसंनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करुन पसार झालेल्या पाच आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×