Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

बसच्या धडकेत तरूण ठार, पिसोळीतील घटना

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव बसच्या धडकेत पादचारी तरूण ठार झाल्याची घटना १५ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास पिसोळी रोडवर घडली आहे. याप्रकरणी अनोखळी बसवरील चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन भीष्माचार्य म्हस्के (वय ३५, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम अडागळे (वय २२ रा. कात्रज) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

गॅस बिल भरण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी घातला गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जन म्हस्के हे १५ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास पिसोळी रस्त्यावरील धर्मावत पेट्रोल पंपाजवळून पायी जात होते. त्यावेळी भरधाव बस चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे अर्जुनचा मृत्यू झाला. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी बसचालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर तपास करीत आहेत.

कंपनीतून ८० हजारांचा ऐवज चोरीला

पुणे- कंपनीच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॅपटॉप, कॅमेरा असा ८० हजारांचे साहित्य चोरून नेले आहेत. ही घटना ६ ते ७ एप्रिलला वारजेतील विघ्नहर सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील विघ्नहर सोसायटीत स्केल आर्टस इन कंपनी असून, त्याठिकाणी लॅपटॉप, कॅमेर्‍यासह इतर साहित्य होते. ६ ते ७ एप्रिल कालावधीत चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून ८० हजारांचे साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नायकावडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×