Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

बालकाच्या मृत्यूप्रकरणी डाॅक्टरांसह परिचारिकेविरुद्ध गुन्हा

- वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणाचा ठपका

वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणाचा ठपका

marathinews24.com

पुणे – बालकावर चुकीचे उपचार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरुन नवी पेठेतील एका रुग्णालयातील डाॅक्टरांसह परिचारिकेविरुद्ध गुन्हा सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुण्यात पीमपी वाहक महिलेवर चाकूने वार – सविस्तर बातमी 

या प्रकरणी डाॅ. मुकुंद संगमनेरकर, डाॅ. गणेश आरेकर, डाॅ. श्रीधर जाधव, डाॅ. राधा संगमनेरकर, तसेच परिचारिका मनीषा शिंदे, सारिका सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत गणपतराव गिते (वय ३४, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम २०२३ अन्वये गु्न्हा दाखल करण्या आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत गिते यांची मुलगी आदिती (वय ११ महिने) हिला उलटीचा त्रास होत असल्याने तिला मे २०२५ रोजी नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारात हलगर्जी केल्यास मुलीचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव डाॅक्टरांना होती. डाॅक्टर, तसेच परिचारिकेने चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप गिते यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता.

त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्यात आले होते. याप्रकरणाची वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने चौकशी केली. चौकशीत ११ महिन्यांच्या बालिकेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने नोंदविला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×