Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडू

पुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची 'लोकोश ॲप'वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडू

२६ हजार ६१०स्वयंसहायता समूहांची डिजिटल नोंदणी पूर्ण

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्वयंसहायता समूह नोंद ‘लोकोश ॲप’वर करणे अनिवार्य केल्याने संपूर्ण २६ हजार ६१० स्वयंसहायता समूहांची ॲप डिजिटल पद्धतीने नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिली आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण – सविस्तर बातमी 

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकल महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘माझे अस्तित्व’ योजनेअंतर्गत तयार होणारे नवीन महिला बचत गटाची देखील सदर लोकेश ॲपवर नोंद करण्याची कार्यवाही प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू आहे. या डिजिटल नोंदणी प्रक्रियेमुळे समूहांची अचूक अशी माहिती संकलित केली जाते आणि भविष्यात वेळोवेळी माहिती सहज उपलब्ध होते.तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत व सहज मिळण्यासाठी या बाबीची मदत होते.

यामुळे योजनेच्या महिला लाभधारकांना प्रत्यक्ष लाभ वेळेत मिळतो. ॲपमध्ये नोंदणी करताना समूहांना विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो आणि त्या ओळख क्रमांकावरून महिलांना एकाच योजनेचा लाभ दुबार मिळत नाही. या शिवाय एखादी महिला अनावधानाने किंवा काही वेगळ्या उद्देशाने वेगवेगळ्या गटांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही टाळले जाते. एका महिलेला एकाच महिला बचत गटामध्ये नियमानुसार राहता येते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता समूहाची स्थापना केली जात ते त्यावरून त्यांचे सामाजिक संघटन व सामाजिक समावेशन केले जाते. त्यानंतर अशा सर्व गटांना ग्राम संघ व प्रभाग संघावर महिलांच्या संस्था स्थापन करून धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करून एकूणच महिलांचे सामाजिक संघटन व आर्थिक समावेशन करून लाभ उपलब्ध करून दिला आहे.

उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांमध्ये बचत स्वयंरोजगार डिजिटल साक्षरता आणि आर्थिक शिस्त यांचा माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून येतआहे या उपक्रमात सर्व पात्र महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या महिला बचत गटांना देण्यात येणारा उमेद अभियानाचा विशिष्ट ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन श्रीमती कडू यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×