Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात मेफेड्रॉन तस्करीप्रकरणी ५ जणांना बेड्या

पुण्यात मेफेड्रॉन तस्करीप्रकरणी ५ जणांना बेड्या

२० लाखांवर ड्रग्ज जप्त

marathinews24.com

पुणे – मेफेड्रॉन बाळगल्‍याप्रकरणी गुन्‍हे शाखेच्‍या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने दोन ठिकाणी कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये मेफेड्रोनसह २० लाख ८० हजारांचा ऐवज जप्‍त केला. यामध्ये ६० ग्रॅम मेफेड्रॉनचा समावेश आहे. याप्रकरणी ५ जणांना बेड्या ठोकण्यात आल्‍या आहेत. दि. १६ एप्रिलच्‍या मध्यरात्री दोन वाजण्याच्‍या सुमारास केसनंद थेऊरोडवरील जोगेश्वरी वजनकाटा येथे कारवाई करून २ लाख ६२ हजारांचे मेफेड्रॉन जप्‍त केले.

कोयत्याच्या धाकाने जबरी चोरी, दोन सराईत गजाआड – सविस्तर बातमी

अनिस शम्‍मू सय्यद (रा. कल्‍याणी पार्क, मांजरी बुद्रुक) आणि हरी उत्‍तम उफाडे (वय ३५, रा. अजमेरा बिल्‍डींग शेजारी, सिध्दार्थनगर, वाघोली) यांना पथकाने ताब्यात घेतले. त्‍याचा साथीदार प्रतिक उर्फ सोन्याबापु दत्‍तात्रय होले(वय ३२ रा. लोणीकंद ता. हवेली, जि. पुणे) ऋषिकेश उर्फ राम अंकुश यनभर (वय २९, रा. कारेगाव ता. शिरूर, जि. पुणे) यांनाही ताब्यात घेऊन पथकाने वाघोली पोलिसांच्‍या हवाली केले आहे.

पुणे-नगर रस्‍त्‍यावरील सिल्‍व्‍हर ओक हॉटेच्‍या पार्कींग परिसारत आरोपींचा शोध घेत असताना रमेश उदाराम सुतार (वय ३४, रा. योजनानगर, लोहगाव मुळ रा. राजस्‍थान) याला ताब्यात घेण्यात आले. त्‍याच्‍याकडून ५५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्‍त करण्यात आले. वाघोलीत पथकाने सलग दोन कारवाया करून खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव भागातील अमली पदार्थाची साखळी उघडकीस आणली आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्‍त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्‍त शंकर खटके, पथकाचे पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×