Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पोलीस चौकीत राडा; तिघांविरुद्ध गुन्हा

पोलीस चौकीत राडा; तिघांविरुद्ध गुन्हा

तिघांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दोन गटातील भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीसश शिपायाला धक्काबुक्की करुन पोलीस चैाकीत गोंधळ घातल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अविनाश हेमंत लाेखंडे (वय २४), अनिकेत हेमंत लाेखंडे (वय २७), वैभव राजू चौगुले (वय २३, सर्व रा. गणेशननगर, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अभिजित आल्हाट (वय २७) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमी – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी भागातील बदामी चौकात २३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन गटात वाद सुरू होते. दोन गटात भांडणे सुरू असल्याची माहिती पोलीस शिपाई आल्हाट यांना मिळाली. त्यानंतर ते भांडणे सोडविण्यासाठी तेथे गेले. तेव्हा आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन वडगाव शेरीतील महात्मा फुले चौकीत नेले. तेव्हा आरोपींनी पोलीस चौकीत गोंधळ घालून स्वत:ला दुखापत करुन घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस चौकीतील साहित्याची तोडफोड आरोपींनी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भरत बाेराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×