पुण्यात पीएमपी बस पळविणारा तरुण ससून रुग्णालयात दाखल

मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय ?

marathinews24.com

पुणे – महापालिका भवन परिसरातून पीएमपी बस पळवून नेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचा संशय पोलिसंनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाता ताब्यात घेण्यात आलेला तरुण मूळचा उत्तराखंडचा आहे.

विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंग – सविस्तर बातमी

महापालिका भवन परिसरातून एका तरुणाने पीएमपी बस पळवून नेल्याची घटना शनिवारी घडली. जंगली महाराज रस्त्यावरून गोखले रस्त्यापर्यंत आलेली ही बस पोलिसांनी प्रसंगावधान राखून थांबवली. पोलिसांच्या प्रसंगवधानामुळे अनर्थ टळला. पीएमपीच्या स्टीअरिंगजवळ लावलेली चावी चालक विसरून गेला. ती पाहून तेथून निघालेल्या तरुणाने त्या चावीने बस सुरू केली आणि महापालिका भवन, जंगली महाराज रस्त्यावरून बस नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्यापर्यंत नेली. त्या वेळी गोखले स्मारक चौकात एक कार्यक्रम सुरू होता. पीएमपी बस पळवून नेल्याची माहिती मिळाल्यानंतर गोखले स्मारक चौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून बस अडविली. बस पळवून नेणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. २० वर्षीय तरुण मूळचा उत्तराखंडचा आहे.

पोलिसांनी चौकशी केली. उत्तराखंडमधील तरुणाच्या आईशी संपर्क साधण्यात आला. तरुण मूळचा पुण्यात कसा आला, याबाबतची माहिती त्याच्या आईला नाही. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तरुण सतत बोलत होता. त्याचे वर्तन पाहता पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पीएमपी बस पळवून नेणाऱ्या तरुणाला ससून रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

– गिरीषकुमार दिघावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×