मशरुम उत्पादक कंपनीतील टाकीत गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू

कौटुंबिक छळ अन जादूटोण्यामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

जेजुरीतील बेलसर गावातील दुर्घटना

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील जेजुरीतील बेलसर येथे मशरुम उत्पादक कंपनीच्या आवारातील सांडपाण्याची टाकी साफ करताना विषारी वायूमूळे गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. पिंटू राजेश प्रसाद (वय २३), व्यास सोहम कुमार (वय २२), गौतम रामशरण कुशवाह (वय ३६) अशी मृत्युमुखी पडलेल्या का्मगारांची नावे आहेत. तिघे कामगार मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.

पुण्यात पीएमपी बस पळविणारा तरुण ससून रुग्णालयात दाखल – सविस्तर बातमी

या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. दुर्घटनेची पोलिसांकडून चौकशी केली जात असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांन दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलसर येथे वाडा ॲग्रो मशरूम कंपनीत मशरुन उत्पादन केले जाते. या कंपनीत १५ ते २० कामगार काम करतात. कंपनीच्या आवारात भूमिगत टाकी आहे. मशरुम उत्पादन करताना पाणी वापरले जाते. या प्रक्रियेतून बाहेर पडलेले पाणी टाकीत सोडले जाते. ही टाकी स्वच्छ करण्यासाठी एक कामगार टाकीत उतरला. प्रक्रिया करुन टाकीत सोडलेले पाणी साचले होते. या टाकीत विषारी वायू साचला होता. टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या एका कामगाराचा श्वास गुदमरल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे थांबलेल्या दुसऱ्या कामगाराने त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. तो टाकीत उतरला. मात्र, त्याचाही श्वास गुदमरला. हा प्रकार पाहून तेथे थांबलेला कंपनीतील ठेकेदार घाबरला. त्याने दोघांना टाकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिघे गुदमरल्याने बेशुद्ध पडले. त्यावेळी कामगारांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केला.

त्यानंतर घटनास्थळी जेसीबी यंत्र मागविण्यात आले. टाकीचा स्लॅब फोडून तिघांना बाहेर काढले. तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांकडून तपास घटनेत मृत्युमुखी पडलेले तीन कामगार मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. मशरुम उत्पादक कंपनीतील सर्व कामगार हे परप्रांतीय आहेत. टाकीत दोन फूट पाणी होते. मात्र, बरेच दिवस टाकी स्वच्छ करण्यात आली नव्हती. मशरुम उत्पादन करताना प्रक्रिया केलेले पाणी या टाकीत सोडण्यात आले होते. विषारी वायू टाकीत साचला होता. वायूमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

दीपक वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक, जेजुरी पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×