पोलीस हवालदारला धक्काबुक्की; चौघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात पोलीस हवालदाराला बेदम मारहाण

चतु:शृंगी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कारवाई करणाऱ्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पाषाण येथील संजय गांधी वसाहतीत ही घटना घडली.

मशरुम उत्पादक कंपनीतील टाकीत गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू – सविस्तर बातमी

पांडू धानावत (वय ४५), विष्णू धानावत (वय ३०), शिवा धानावत (वय ३०), लिलाबाई पांडू धानावत (वय ३५, सर्व रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, पाषाण) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार शरद होनमाने यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, पोलीस हवालदार होनमाने आणि सहकारी हे २४ एप्रिल रोजी संजय गांधी वसाहत परिसरात रात्री अकराच्या सुमारास गस्त घातल होते. त्या वेळी वसाहतीत वाद सुरू होता. पोलीस हवालदार आणि सहकारी कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक येळे तपास करत आहेत.

वडगाव शेरी परिसरात दोन गटातील भांडणे सोडविणाऱ्या पोलीस शिपायाला मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकणात तिघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना पोलीस चौकीत नेण्यात आले. पोलीस चौकीत आरोपींनी गोंधळ घालून तोडफोड केली होती. पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की होण्याची ही दुसरी घटना आहे.

आप्पा बळवंत चौकात महिलेचे दागिने चोरी

पुणे-मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना आप्पा बळवंत चौकात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६० वर्षीय महिला बुधवार पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या २३ एप्रिल रोजी आप्पा बळवंत चौकातील एका मठात रात्री पावणेदहाच्या सुमारास दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिरात गर्दी होती. गर्दीतून बाहेर पडत असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार नाकाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×