Breking News
Developed Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’ आयोजित “iधम्म पहाट” कार्यक्रमाचे यंदा २० वे वर्ष

marathinews24.com

पुणे – तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमे निमित्त ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने १ ते ३ मे २०२६ दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रयमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमा दरम्यान भव्य खिरदान वाटपही करण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष व पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

बारामती येथे पोस्टल पेन्शन अदालतीचे आयोजन – सविस्तर बातमी 

पुढे बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या या उपक्रमाचे यंदा 20 वे वर्ष आहे. या अंतर्गत येत्या शुक्रवारी, दि. १ मे २०२६ रोजी पहाटे ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे बुद्ध-धम्म गीतांचा ‘मंगलमय पहाट’ हा कार्यक्रम होणार आहे. चेतन चोपडे यांच्या संकल्पनेतून ‘तुझ्या पाऊलखुणा भीमराया’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून, विकास साळवे, चेतन चोपडे आणि स्नेहल प्रधान यांचा यामध्ये सहभाग असणार आहे.
तसेच, बौद्ध पौर्णिमेनिमित्त शनिवार, दि. २ मे आणि रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘बुद्ध-धम्म संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तथागत गौतम बुद्ध विहार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जोशी गेट येथे होणार आहे. यामध्ये २ मे रोजी सिने कलाकार तसेच युवा संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायक भाग्यश्री अंधारे, संतोष मोरे आणि निखिल महाडे हे बुद्ध – भीम गीते सादर करणार आहेत. तर ३ मे रोजी अशोक गायकवाड आणि त्यांच्या टीमकडून ‘रथ भीमाचा हा नेऊ पुढे’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे, असे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×