Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तस्करांना दणका

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तस्करांना दणका

१९ आरोपींना अटक, ५८ लाखांचे ड्रग्ज जप्त

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थांचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर परिमंडळ सातच्या हद्दीत १ ते २३ एप्रिल कालावधीत अमली पदार्थ विरोधी मोहिम राबवण्यात आली. त्यामध्ये तब्बल १३ गुन्हे दाखल करून १३ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात आणखी सहा जणांना राजस्थानातून ताब्यात घेत अटक केली आहे. संबंधितांकडून तब्बल ५८ लाख १८ हजारांचे विविध ड्रग्ज जप्त केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे.

पुण्यात अनधिकृत वास्तव्य, ३ बांग्लादेशी महिला ताब्यात – सविस्तर बातमी 

अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविण्यासाठी परिमंडळ सातच्या हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक तयार केले होते. त्यानंतर १ ते २३ एप्रिल कालावधीत संबंधित पथकांनी मोहिम राबवून अमली पदार्थ विक्रेते, खरेदीदारांची उचलबांगडी केली. वाघोली, लोणीकंद, लोहगाव, विमानतळ, चंदननगर, खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील माहिती प्राप्त करीत छापे टाकण्यात आले. त्यामध्ये मेफेड्रॉन (एम.डी), गांजा विक्रीसह सेवन करणार्‍याविरूद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत १३ गुन्हे दाखल केले आहे. अटक आरोपींकडे तपास केला असता, त्यांनी राजस्थानमधून मेफेड्रॉन (एम.डी) अंमली पदार्थ प्राप्त केल्याची माहिती दिली.

आरोपींना अंमली पदार्थ पुरविणारे सहआरोपींची पथकाने नावे निष्पन्न केली. त्यानंतर आणखी एक विशेष पथक तयार करुन राजस्थानात पाठवण्यात आले. त्याठिकाणाहून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. मोहिमेत १९ आरोपी अटक केली असून, ५८ लाख १८ हजारांचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्यामध्ये २८९.१९ ग्रॅम (एम.डी), ४२२ ग्रॅम गांजा, २६० ग्रॅम (एमडीचा अंश पावडर) मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. दरम्यन, आपल्या परीसरामध्ये कोणीही अमंली पदार्थाचे विक्री होताना अथवा सेवन करताना आढल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×