Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

दारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून

भांडणाच्या रागातून तरूणाचा केला खून

कोंढवा परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – दारू पिताना झालेल्या वादातून केटरिंग व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. मनीषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. पंचशीलनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी महादेव अर्जुन कांबळे (वय ३५, रा. श्री स्वामी समर्थनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्याथ फिर्याद दिली आहे.

बाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि पासवान हे केटरिंग व्यावसायिकाकडे कामगार म्हणून काम करतात. केटरिंग व्यावसायिक, तसेच मिळेल ते काम ते करतात. दोघांना दारु पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास कांबळे आणि पासवान हे कोंढव्यातील आर. के. काॅलनी परिसरातील टेकडीजवळ असलेल्या झाडाखाली दारू पित बसले होते. त्या वेळी त्यांच्यात वाद झाला. त्या वेळी कांबळेने पासवान याच्या डोक्यात दगड घातला. पासवान गंभीर जखमी झाला. कांबळे तेथून पसार झाला. दरम्यान, कांबळेने या घटनेची माहिती भावाला दिली. भावाने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई, पोलीस निरीक्षक दीपक कारंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या कांबळेला पकडले. पोलीस निरीक्षक कारंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×