Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

लाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक

पुण्यात लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

marathinews24.com

पुणे – अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजारांची लाच मागणाऱ्या लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. लोहगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली..मनोज मधुकर बरुटे (वय ३८, रा. गंगा सोसायटी, कळस, आळंदी रस्ता) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बरुटे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

दारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून – सविस्तर बातमी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारादाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पोलीस उपनिरीक्षक बरुटे यांनी सुरुवातीला ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. तक्रारदाराला लोहगाव पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी (१ मे) सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक बरुटे यांनी बोलाविले. तक्रारदाराक़डून ८० हजारांची लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×