Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’; राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जनगणना २०२७’ मध्ये सक्रीय सहभाग नोंदवून आपली स्व-गणना पूर्ण केली आहे. ‘जनगणना २०२७’ ही केवळ नोंदणी नसून शाळा, रुग्णालय तसेच कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते, यामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाला विविध पायाभूत सुविधांचा लाभ मिळावा, याकरीता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी

श्रीमती पवार म्हणाल्या, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र राज्यात १ मे पासून सुरुवात झाली असून ‘स्व-गणना’ प्रक्रिया १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता केंद्र शासनाने https://se.census.gov.in/संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी या संकेतस्थळाचा वापर करुन आपल्या सोयीनुसार अद्ययावत माहिती भरावी.

स्व-गणनेच्या टप्प्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक गृहभेटी देणार असून जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलित करणार असून यावेळी प्रगणकास संपूर्ण सहकार्य करावे. आपण दिलेली माहिती अत्यंत गोपनीय असण्यासोबत ती कायद्याने सुरक्षित असणार आहे. या माहितीचा वापर राज्याच्या विकास आणि नियोजनासाठी केला जाणार आहे, त्यामुळे या राष्ट्रीय मोहिमेत राज्यातील नागरिकांनी एकजुटीने सहभागी होऊन स्व-गणना करावी, असे आवाहनही श्रीमती पवार यांनी केले.

यावेळी उपायुक्त तथा शहर जन गणना अधिकारी विजय लांडगे, सहायक आयुक्त तथा चार्ज अधिकारी बाळासाहेब ढवळे आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×