Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेटनसरापुरात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यातसत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने व सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेख

पुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाच प्रकरणात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाड जवळ सापळा रचून कारवाई

marathinews24.com

पुणे – पदोन्नती झाल्यानंतर नव्या पदावर रुजू होण्यापूर्वीच महिला सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्यासोबत एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. लुचपत प्रतिबंधक विभागाने बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाड जवळ सापळा रचून कारवाई केली. घटनेनंतर पथकाने महिला पोलीस अधिकारी बसत असलेल्या पोलीस आयुक्तालयातील जागेचा सर्च घेतला. वैशाली तोटेवार असे अटक केलेल्या महिला अधिकार्‍याचे नाव आहे. दरम्यान, लोहगाव ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक यांना एसीबीने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.

लाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक – सविस्तर बातमी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एपीआय वैशाली तोटेवार पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्तीला होत्या. त्यांच्याकडे ८ ते ९ तक्रार अर्ज तपासासाठी देण्यात आले होते. त्याचा तपास सुरु असतानाच त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढतीवर मुंबई लोहगाव पोलीस येथे बदली झाली होती. त्यांना पुणे पोलीस दलातून शुक्रवारी ( दि. १ ) कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वीच कारवाई सुरु केली होती. आरोपी तोटेवार यांनी तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये ३० लाखांची लाच मागितली होती. त्यात एका खासगी व्यक्ती मार्फत त्यांनी २ लाख रुपये स्वीकारले होते. त्यानंतर शनिवारी (दि.२) दोन्ही आरोपी उर्वरित रक्कम घेण्यासाठी बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाड येथे गेले. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २८ लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या खासगी व्यक्तीला पकडले. पाठोपाठ वैशाली तोटेवार यांना ताब्यात घेतले. दुसर्‍या दोन पथकांनी पोलीस आयुक्तालयातील तोटेवार यांच्या कार्यालयासह आणखी एका पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली आहे.

पदोन्नतीचा पदभार घेण्याआधी लाच घेतली

एपीआय वैशाली तोटेवार यांची पुण्यातून नुकतीच पदोन्नतीने पोलीस निरीक्षक मुंबई लोहमार्ग याठिकाणी बदली झाली आहे. शुक्रवारी (दि. १ ) त्यांना पुणे पोलीस दलातून कार्यमुक्त करण्यात आले होते. मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर हजर होण्याआधी त्यांनी खासगी व्यक्तीमार्फत २८ लाख रुपये रक्कम स्वीकारली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×