कर्तृत्व, प्रेरणा आणि अभिमानाचा भव्य उत्सव संपन्न
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि कर्तृत्वाला सलाम करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी “प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार २०२६” हा भव्य व प्रेरणादायी सोहळा २ मे रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह, येरवडा, पुणे येथे आनंदमय वातावरणात संपन्न झाला.महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स, आझाद फाउंडेशन आणि टाईम्स ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश चिवटे (विशेष कार्यकारी अधिकारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहून आयोजक व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.तसेच शामकांत शेडगे (अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह), तृप्ती ताई देसाई (संस्थापिका, भूमाता ब्रिगेड), अंजुम बागवान (पोलीस निरीक्षक), रवींद्र कदम, प्राचार्य दत्तात्रय कोबरने, किरण कोरे (व्याख्याते), दीपक राजे शिर्के (प्रदेशाध्यक्ष, माजी सैनिक सेल) तसेच डॉ. नेहा सिंग (संचालक, सह्याद्री हॉस्पिटल) हे मान्यवर उपस्थित होते.
उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना आदम सय्यद (अध्यक्ष, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स) म्हणाले, या भव्य सोहळ्यास सह्याद्री हॉस्पिटल आणि गजलक्ष्मी ज्वेलर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक भव्यता प्राप्त झाली.हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या कर्तृत्व, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सतीश राठोड, स्नेहा कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर व सहभागींचे आभार मानले. तसेच अनिल घारे आणि साहिल शेख यांच्या विशेष परिश्रमांमुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.























