Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडली सिंगापूर शैक्षणिक सफर

स्वान फाउंडेशन आणि डॉ. अनिलकुमार गायकवाड सामजिक सेवकुंडचा उपक्रम; जागतिक संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञानाचा अनुभव;  महाराष्ट्रातील १३ विद्यार्थ्यांना संधी

marathinews24.com

पुणे – विद्यार्थ्यांना जागतिक संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने ‘स्वान’ (Swan) फाऊंडेशनतर्फे आयोजित सिंगापूर शैक्षणिक व प्रेक्षणीय सहल उत्साहात पार पडली. पाच दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्थळांना भेट देत ज्ञानासोबतच मनोरंजनाचाही आनंद लुटला. सिंगापूर शैक्षणिक सहल पूर्ण करून भारतात परतल्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक  अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते कुसगाव (मिसिंग लिंक प्रकल्प परिसर) येथे करण्यात आला.

गझल-गीतांतून उलगडली महामानवांची महती – सविस्तर बातमी

स्वान सोशल स्टडी अँड रिसर्च फाऊंडेशन आणि डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवकुंड यांच्या वतीने टेक्नसिंक इनोव्हेशन्स प्रा. लि. आणि चेन सेन्स इंडिया प्रा. लि. यांच्या आर्थिक सहकार्याने ग्रामीण महाराष्ट्रातील १३ गुणवंत विद्यार्थ्यांची या पूर्णतः प्रायोजित सहलीसाठी निवड करण्यात आली होती. ही निवड ‘डॉ. ए. बी. गायकवाड नॉलेज नेस्ट परीक्षा’द्वारे करण्यात आली. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या परीक्षेत राज्यभरातील ४,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी  प्रसंगी फाउंडेशनचे उपाध्यक्ष अश्विनी कांबळे, सचिव विकास टाकळीकर, सीइओ   प्रसादराजे भोपळे, तसेच टेक्सिंक चे अमन पाचगरे आणि चेअरमन  गणेश लोरे उपस्थित होते.

फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, या उपक्रमात इंग्रजी, सेमी-इंग्रजी तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. NASA (अमेरिका) येथे १५ विद्यार्थी आणि सिंगापूर येथे १५ विद्यार्थ्यांना नेल्यानंतर, लवकरच ७ विद्यार्थ्यांना United Nations मुख्यालयात Policy Debate साठी घेऊन जाण्याचा मानस आहे.” तसेच त्यांनी जाहीर केले की, Knowledge Nest Examination 2026 लवकरच आयोजित करण्यात येणार असून, त्यातून निवडलेल्या ३० विद्यार्थ्यांना अमेरिका, सिंगापूर आणि UN येथे शैक्षणिक सहलीसाठी नेण्यात येईल.

यावेळी बोलताना अनिलकुमार गायकवाड यांनी  या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “हा अत्यंत अभिनव उपक्रम असून भारताच्या भविष्यासाठी एक अनमोल योगदान आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल.” त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

सहलीची सुरुवात जगप्रसिद्ध चांगी विमानतळावरील ‘ज्वेल’च्या भेटीने झाली. त्यानंतर सिंगापूर शहरदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी आधुनिकता आणि इतिहासाचा संगम अनुभवला. ‘आर्ट अँड सायन्स म्युझियम’मध्ये कला व विज्ञानाचा अनोखा मेळ पाहता आला, तर ‘गार्डन्स बाय द बे’मधील ‘फ्लॉवर डोम’ आणि ‘क्लाउड फॉरेस्ट’मध्ये दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. मनोरंजनाच्या दृष्टीने ‘युनिव्हर्सल स्टुडिओ’ हे सहलीचे प्रमुख आकर्षण ठरले. विविध राईड्स आणि चित्रपटसृष्टीचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. ‘सेंटोसा आयलंड’वरील केबल कार प्रवास, ‘मादाम तुसाद’मधील मेणाचे पुतळे आणि ‘विंग्स ऑफ टाइम’ लेझर शोने सहलीला विशेष रंगत आणली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×